दार उघड उद्धवा, दार उघड ; राज्यात आध्यात्मिक समन्वय आघाडीचे दिनांक २९ रोजी आंदोलन 

दार उघड उद्धवा, दार उघड ; राज्यात आध्यात्मिक समन्वय आघाडीचे दिनांक २९ रोजी आंदोलन 


दार उघड उद्धवा, दार उघड ; राज्यात आध्यात्मिक समन्वय आघाडीचे दिनांक २९ रोजी आंदोलन मुंबई : राज्यातील धार्मिकस्थळे सुरू करावीत या मागणीसाठी राज्यातील विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या समित्यांच्या प्रमुखांची नुकतीच एक बैठक पार पडली.


 


आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या पुढाकाराने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. यावेळी येत्या शनिवारी २९ ऑगस्ट रोजी राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. 'दार उघड उद्धवा, दार उघड', अशी आरोळी देत हे आंदोलन करण्यात येणार असल्याचंही या आघाडीने स्पष्ट केलं.


 


या बैठकीला शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी अध्यक्ष अतुल भोसले, श्रीसिद्धिविनायक मंदिर समितीचे विश्वस्त सुमंत घैसास यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments