अहंकारातून विद्यार्थ्यांचे महाविकास आघाडी सरकारने  नुकसान केले : आशिष शेलार


 


अहंकारातून विद्यार्थ्यांचे महाविकास आघाडी सरकारने  नुकसान केले : आशिष शेलार


 


मुंबई :  एका "बबड्याच्या" हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टानं अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिल्यानंतर शेलार यांनी ट्वीट केलं आहे. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार...! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!, असे ट्वीट त्यांनी केले आहे.कुलपती म्हणून मा.राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही. शिक्षण तज्ञांची मते धुडकावली. युजीसीला जुमानले नाही. मंत्री मंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेर पर्यंत वेठीस धरले. अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले. काय साध्य केले? असा सवाल शेलार यांनी केला आहे.


 


महाराष्ट्रातील "पाडून दाखवा सरकारने" स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले! पण... विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो खचून जाऊ नका... परिस्थितीला धैर्याने समोरे जाऊ या..यश तुमच्या वाट्याला नक्की येईल...तुमचे भविष्य उज्वलच असल्याचे शेलार म्हणाले आहेत.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments