तुकाराम मुंढे यांची नागपूर येथून “या” ठिकाणी बदली 


तुकाराम मुंढे यांची नागपूर येथून “या” ठिकाणी बदली मुंबई : नागपूर महापालिकेतील भाजपा नगराध्यक्षांविरोधातील वाद आयुक्त तुकाराम मुंढे यांना भोवला असून मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे.मुंढे यांच्याजागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन यांना पदभार सोपवून तत्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जबाबदारी स्वीकारावी असा आदेश काढण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे.नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्त म्हणून कडक निर्बंध आणल्याचे दिसत होते. मात्र यावरुनच महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्याशी मुंढे यांचे तीव्र मतभेद निर्माण झाले होते.


 


माणदेश टाइम्स whatasapp वर Free update मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा


Post a Comment

Previous Post Next Post