सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ 

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ 


 


सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ 
सांगली : सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून आज सकाळी पाणी पातळी ३३ फुटावर गेली आहे. पाणी पातळी वाढल्याने सांगलीत सूर्यवंशी प्लॉट मधील नागरिकांच्या वस्तीमध्ये पाणी शिरू लागल्याने तेथील ४० कुटुंबियांचे महानगरपालिकेने स्थलांतर सुरु केले आहे.तसेच कृष्णा नदीकाठी असणाऱ्या प्रसिद्ध औदुंबर येथील तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा पाणी शिरले आहे. कोयना धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. सांगलीच्या उपनगरातील सखल भागामध्ये असणाऱ्या नागरिकांना महानगरपालिकेने स्थलांतर करण्याचा सूचना दिल्या आहेत. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


 


Post a comment

0 Comments