सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र क्षीरसागर यांचा अपघाती मृत्यू

सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र क्षीरसागर यांचा अपघाती मृत्यू


सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र क्षीरसागर यांचा अपघाती मृत्यू
माणदेश एक्सप्रेस न्युजपंढरपूर : पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र क्षीरसागर (Assistant Inspector of Police Rajendra Kshirsagar) (वय 35) यांचे आज पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले. महूदकडून पंढरपूर कडे येत असताना कोर्टी गावाजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. सदर घटनेचा तपास (Police Inspector Prashant Bhasme of Pandharpur Rural Police Station) पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे हे करत आहेत.


 


क्षीरसागर हे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन (Pandharpur City Police Station) मध्ये रुजू झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते सुट्टीवर होते. मुळचे ते लातुर जिल्हयातील होते. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे पोलीस दलातुन हळहळ व्यक्त होत आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments