Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री सहायता निधीला सारस्वत बँकेकडून एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द


 


मुख्यमंत्री सहायता निधीला सारस्वत बँकेकडून एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द



मुंबई, दि. २८ :- मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सारस्वत बँकेकडून एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. या निधीचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.



मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी धनादेश सुपूर्द केला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच बँकेचे उपाध्यक्ष एस. के. साखळकर, संचालक के.व्ही. रांगणेकर, व्यवस्थापकीय संचालक श्रीमती एस. एम. सैंदाणे, मुख्य व्यवस्थापक अजय जैन आदी उपस्थित होते.



 
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करण्यासाठीची माहिती खालीलप्रमाणे
 
इंग्रजीत-
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300



 
मराठीत-
मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300



सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies