माजी सनदी अधिकारी व राष्ट्रवादीचे 'हे' नेते कोरोनाग्रस्त 


माजी सनदी अधिकारी व राष्ट्रवादीचे 'हे' नेते कोरोनाग्रस्त माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/प्रतिनिधी : सेवानिवृत्त सनदी अधिकारी व राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Retired chartered officer and NCP leader Prabhakar Deshmukh contracted corona) जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते माण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या खाजगी कार्यक्रमांसाठी तसेच भेटीगाठी घेण्यासाठी गावी आले होते.


 


या दरम्यान, त्यांनी (Prabhakar Deshmukh's presence at events at Mhaswad and Divad) म्हसवड व दिवड येथे कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती. त्यानंतर ते आपल्या एका सहकाऱ्यासोबत पुण्याला परत गेले होते. काही दिवसातच संबंधित त्या सहकाऱ्याला त्रास जाणवू लागल्याने त्याने कोरोनाची चाचणी केली असता  दोन ऑगस्टला त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संबंधित सहकाऱ्याने याबाबत श्री. देशमुख यांना कल्पना दिली.


 


याबाबत श्री. देशमुख यांनी तत्काळ काळजी घेत स्वतःला होम क्वारंटाईन करून स्वॅब तपासणीसाठी दिला. या तपासणीचा अहवाल सहा ऑगस्टला आला. यात (It is clear that Prabhakar Deshmukh also contracted corona) श्री. देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. श्री. देशमुख यांनी वेळीच स्वतःला होम क्वारंटाईन केल्यामुळे कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला कोरोनाची बाधा झालेली नाही.तसेच त्यांची तब्येत ही ठिक आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची काळजी घ्यावी, तसेच ( Contact the health department immediately if you experience any symptoms of corona) कोरोनाबाबत काही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad