Type Here to Get Search Results !

आमदार अतुल बेनके यांचे ट्विट व्हायरल, देवेंद्र फडणवीसांना म्हणाले.....


आमदार अतुल बेनके यांचे ट्विट व्हायरल, देवेंद्र फडणवीसांना म्हणाले.....माणदेश एक्सप्रेस टीम


 


आटपाडी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चिंचवड येथे  ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र येथे २००  खाटांचे  जम्बो सेंटर कोविड सेंटर उभारले. या सेंटरचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.


 


याचे उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणीस यांचे फोटो मोठ्या प्रमाणात वायरल झाले. उद्घाटनासाठी बांधण्यात आलेले रेबिन ज्यावेळी कापण्यात आली त्यावेळी त्याच्या एक बाजू माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या हातात गेल्याने यावर राष्ट्रवादीचे आमदार वल्लभ बेनके यांनी ट्विट केले असून हे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे


 


 


ट्विट करताना आमदार अतुल बेनके म्हणाले, “सत्तेची दोरी अशीच कापली हातात उरल्या फक्त 105  झिरमाळ्या” माळ्या यावर नेटिझन्सनी मोठ्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. “ठीक आहे, भाजपचे सरकार पाच वर्षाच्या पुढे सरकतच नाही हे गणित सोडवा”  “अहो 105 सध्या आहेत कुठे” आधी आपल्या तालुक्यातील खड्डे बुजवा” , “ट्विट जिव्हारी लागले की चाळीस पैसेवाली गर्दी करायला लागतात”,  “भरपूर धूर निघालाय”, “रोजगार निर्मिती केली आहे आपण दादा” असे एक ना एक भन्नाट ट्विट करत नेटकऱ्यांनी कमेंट दिल्या आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies