इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे दोषींवर तात्काळ कारवाई : एकनाथ शिंदे

इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे दोषींवर तात्काळ कारवाई : एकनाथ शिंदे


इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे दोषींवर तात्काळ कारवाई : एकनाथ शिंदे


 रायगड : महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप 19 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर आतापर्यंत 60 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान या प्रकरणी जो कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


 


महाडमध्ये झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. अजूनही आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. या इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे याप्रकरणी जो कोणी दोषी आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 


 


तसेच या दुर्घटनेत जखमी किंवा मृत व्यक्तींच्या कुटुंबाला सरकारकडून योग्य ती मदत दिली जाईल. तसेच शहरात ज्या काही जुन्या इमारती आहेत. त्यांच्यासाठी क्लस्टर योजना आणली जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.


 


नेमकी घटना काय?


 


महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत काजलपुरा भागात 05 मजली इमारत काल सायंकाळी सातच्या सुमारास कोसळली. या इमारतीचं नाव तारीक गार्डन असं होतं. यामध्ये 45 ते 47 फ्लॅट होते. या दुर्घटनेत अनेक रहिवाशी अडकले होते. त्यानंतर प्रशासनाने युद्ध पातळीवर बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.


 


तब्बल पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारतीचा पाया खचल्यामुळे ती आहे तशीच खाली बसली. एखादी इमारत तयारी करुन पाडली जाते, अगदी तसंच वाटावं, अशी ही इमारत जागच्या जागी खाली बसली. इमारतीचा राडारोडा उपसण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी हा ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments