निंबवडेत आजपासून १३ सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू ;कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीची निर्णय 

निंबवडेत आजपासून १३ सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू ;कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीची निर्णय 


 


निंबवडेत आजपासून १३ सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू ;कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीची निर्णय 
माणदेश एक्सप्रेस न्यूजआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना संसर्गजन्य विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव सुरु आहे. तालुक्यातील काही गावात तर कम्युनिटी स्प्रेड सुरु असून मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावामध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूची साखळी तोडण्यासाठी अनेक गावामध्ये जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येवू लागले आहेत. असाच निर्णय तालुक्यात निंबवडे गावी घेण्यात आला असून निंबवडे गावामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना म्हणून ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती, सर्व पक्षीय नेते, व्यापारी, भाजीपाला विक्रते व ग्रामस्थ यांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे आजपासून 13 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येवून गाव बंद करण्यात येणार आहे.या बंद कालावधीमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडा. कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्यास त्वरित शासकीय रुग्णालयात  तपासणी करा. घराबाहेर पडताना मास्क चा वापर करा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. घरी राहा सुरक्षित राहा. असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन समिती व निंबडेच्या सरपंच नंदाताई देठे यांनी नागरिकांना केले आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


 


 


Post a comment

0 Comments