हिवतड येथील ट्रान्सफॉर्मर खालील फ्युज पेट्या बंदिस्त करा ; महावितरणला वारंवार सूचना देवून नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष 

माणदेश एक्सप्रेस टीमहिवतड/नंदकुमार कोळी : हिवतड ता. आटपाडी, जि.सांगली गावातील देशमुख वस्ती जवळ असलेले वीजवितरण कंपनीच्या विज पुरवठा करणाऱ्या केबल व फ्युज या जुन्या होऊन उघड्या असल्याने जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे देशमुखवस्ती जवळ असलेले वीजवितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर खालील प्युज व केबल दुरुस्त करावे व सोबतच हिवतड गावालगत असलेले वीजवितरण कंपनीचे 5 ट्रान्सफॉर्मरला सुरक्षित करावे अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत.याबाबत हिवतड येथील ग्रामस्थ दत्तात्रय काळे म्हणाले, सध्या पावसाचा हंगाम चालू असल्याने ट्रान्सफॉर्मर खालील मोकळ्या जागेत गवत उगवते व हेच गवत खाण्यासाठी शेळ्या,मेंढ्या,गाई, म्हशी या उघड्या फ्यूज पेट्या जवळ जातात त्यामुळे या जनावरांचा शॉक लागून मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे गावातील सर्व ट्रान्सफॉर्मर सोबत जोडलेल्या फ्यूज पेट्या दुरुस्त करून होणारा धोका टाळावा.याबाबत वायरमन यांना याविषयी अभिजित देशमुख यांनी वारंवार तोंडी सूचन देवून ही आज अखेपर्यंत कसलीही कार्यवाही होत नसल्याने खंत व्यक्त केली जात आहे. तरी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेवून सदर ट्रान्सफॉर्मर खालील फ्युज पेट्या दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे. 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments