जिल्हात शासकीय व खाजगी  39 रूग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार सुरू जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : नव्याने 10 खाजगी हॉस्पीटल अधिग्रहीत


 


जिल्हात शासकीय व खाजगी  39 रूग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार सुरू
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : नव्याने 10 खाजगी हॉस्पीटल अधिग्रहीतमाणदेश एक्सप्रेस न्युजसांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व कोरोना बाधित रूग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रूग्णालयाबरोबरच खाजगी रूग्णालये अधिग्रहीत करण्यात येत आहेत. आज नव्याने 10 खाजगी रूग्णालये अधिग्रहीत करून सुरू करण्यात आली असून आजअखेर कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय व खाजगी अशा एकूण 39 रूग्णालयांमध्ये कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.


 कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी सुरू करण्यात आलेली खाजगी रूग्णालये पुढीलप्रमाणे. क्रांती कार्डिक सेंटर सांगली (Paid), लाईफ केअर हॉस्पीटल सांगली, लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल तासगाव (MJPJAY), तासगाव कोविड-19 केअर हॉस्पीटल (Paid), श्री हॉस्पीटल विटा (Paid), स्पंदन हॉस्पीटल आष्टा  (Paid), साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल इस्लापूर (Paid), सुश्रुशा हॉस्पीटल इस्लामपूर (Paid), आस्टा क्रिटीकेअर हॉस्पीटल (Paid) व आधार हॉस्पीटल इस्लामपूर (Paid).


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

Previous Post Next Post