युवती वर बलात्कार करणारा पोलिस निरिक्षक विपिन हसबनिस निलंबित

युवती वर बलात्कार करणारा पोलिस निरिक्षक विपिन हसबनिस निलंबित


 


युवती वर बलात्कार करणारा पोलिस निरिक्षक विपिन हसबनिस निलंबितकडेगाव : स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मदत करतो असे सांगत युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी कडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस याला निलंबित करण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली.याबाबत अधिक माहिती अशी, पिडित मुलगी व तिची आजी कासेगाव बस थांब्याजवळ थांबलेले असताना  कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हसबनिस यांनी  पिडीत मुलीस कासेगाव बस स्थानकाजवळ कोठे जाणार आहेत?  असे विचारत मदत करण्याचे हेतुने लॉकडाऊन काळात तुम्हाला वाहन मिळणार नाही, तुम्हाला मी कराडला सोडतो असे सांगून ओळख करून घेतली. त्यानंतर कराड येथे सोडेपर्यंत फिर्यादिची सर्व माहिती घेऊन मदत करण्याच्या बहाण्याने संबंधित तरुणीचा मोबाईल नंबर घेतला. माझी पत्नी स्पर्धा परीक्षेची मार्गदर्शक असून ती तुम्हाला मार्गदर्शन करेल असे सांगून कडेगाव येथील बंगल्यावर संबंधित तरुणीला बोलावून घेतले व वारंवार बलात्कार केला. बलात्कार बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास आत्महत्या करेन अशी धमकी पोलीस निरीक्षक हसबनिस यांने दिली होती. गुन्हा नोंद झालेपासुन विपिन हसबनिस हा फरारीच आहे. अखेर त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments