Type Here to Get Search Results !

आटपाडीत 40  बेडचे कोव्हिड रुग्णालय होणार पालकमंत्री जयंत पाटील : कोरोना संदर्भात आढावा बैठक संपन्न 


 


आटपाडीत 40  बेडचे कोव्हिड रुग्णालय होणार
पालकमंत्री जयंत पाटील : कोरोना संदर्भात आढावा बैठक संपन्न 



आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांनी तालुक्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिल बाबर आदी उपस्थित होते.



यावेळी जयंत पाटील यांनी संस्थांनी संस्थानी कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी पुढाकार घेनेचे व आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी  बीएचएमएस डॉक्टरांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करून घ्यावे असे आदेश दिले. ऑक्सिजन औषधाची टंचाई आहे त्याचा पुरवठा करण्याची हमी दिली.



तसेच शासकीय व निमशासकीय शाळा व हायस्कूल कर्मचाऱ्यांना मदतीसाठी घ्यावे. कंटेनमेंट झोन घरापुरता मर्यादित करावा. शाळा व हायस्कूल ताब्यात घेताना विद्यार्थी व शिक्षकांची गैरसोय होऊ नये आदी महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या. आटपाडीत कोरोना ची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना बेड उपलब्ध व्हावे, ऑक्सिजनची सुविधा व्हावी, उपचार अभावी रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात यावी. रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासंदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला.



यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य वैद्यकीय अधिक्षक डॉ. इम्रान तांबोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साधना पवार, सुविधा हॉस्पिटलचे डॉ. विनय पत्की. श्री सेवा आयसीयुचे डॉ. विनय हातेकर यांनी कोरोना रुग्णावर उपचार संदर्भात अडीअडचणी विषयी चर्चा केली.



बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, माजी जि.प. सदस्य तानाजीराव पाटील, स्वाभिमानीचे भारत (तात्या) पाटील, सभापती भूमिका बेरगळ, जि.प. सदस्य अरुण बालटे, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य हर्षवर्धन देशमुख, आटपाडीच्या सरपंच वृषाली पाटील, उपसरपंच अंकुश कोळेकर, दिघंचीचे सरपंच अमोल मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, पाणी संघर्ष चळवळीचे नेते आनंदराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य कार्यकारणी सदस्य रावसाहेब पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डी.एम, पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्ष अनिता पाटील प्रांताधिकारी संतोष भोर, तहसिलदार सचिन लंगुटे, सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies