कृषीकन्येकडून फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन 

कृषीकन्येकडून फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन 


 


कृषीकन्येकडून फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन 


माणदेश एक्सप्रेस न्युज


 


माळशिरस/विष्णू भोंगळे :  महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथे कृषी कन्या आरती विजय शिंदे हिने फळ बाग उत्पादक शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.


 


आरती शिंदे हिने फळ बागांना रिंग पद्धतीने खते कशी द्यावी, गुटी कलम इत्यादी प्रात्यक्षिक करून दाखविले व मार्गदर्शन केले. फळ बागांना त्याच्या वाढीनुसार  कोणते खत व कोणत्या  पद्धतीने द्यावे,तसेच गुटी कलम करून साहसी मुळांची निर्मिती करून नवीन रोप कसे तयार करावे  या बद्दल मार्गदर्शन केले.


 


प्रात्यक्षिक करताना गावातील मल्हारी भुजबळ, महादेव सावंत, नंदा सावंत,  राहुल पालवे इत्यादी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. हे प्रात्यक्षिक करण्यासाठी तिला शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी.पी. कोरटकर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.आर.जी. नलवडे,  कार्यक्रम समन्वयक प्रा.एस.एम.एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.आर.अडत, प्रा.डी.एस. मेटकरी, डॉ.डी.एस.ठवरे यांचे मार्गदर्शन लाभले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments