दिघंची : साळशिंगमळा येथील रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे घरापर्यंत पाणी

दिघंची : साळशिंगमळा येथील रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे घरापर्यंत पाणी


 


दिघंची : साळशिंगमळा येथील रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे घरापर्यंत पाणी


माणदेश एक्सप्रेस टीमआटपाडी/प्रतिनिधी : दिघंची ता. आटपाडी, जि.सांगली येथील साळशिंगमळा येथील रहिवाशी रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे त्रस्त झाले आहेत.आटपाडी-दिघंची रस्त्यावरती साळशिंगमळा येतो. या ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे. सध्या पावसाळा सुरु असून सतत पाऊस सुरु आहे. या पावसामुळे साळशिंगमळा येथील रहिवाशी ज्ञानेश्वर शिंदे, गणेश शिंदे यांच्या घरापर्यंत पाणी येत असून रस्तालगतच्या नाल्याचे काम झाले नसल्याने पाणी घराच्या पायरी पर्यंत पोहचत आहे.


 


कंत्राटदार यांनी पावसापूर्वी नाला खोलीकरण न केल्याने ही परिस्थिती उदभवली आहे. पावसाचे संपूर्ण पाणी रस्त्यावर, रस्त्याशेजारी असणाऱ्या रानात शिरल्याने पिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे. गेले चार दिवस सांगूनही कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे सदर रस्त्याचे अपूर्ण असणारे काम तत्काळ पूर्ण करावे अशी मागणी दिघंची ग्रामपंचायतीचे सदस्य केशव मिसाळ यांनी केली आहे.  


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments