भारतात कोरोनाचे थैमान ; देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55 लाखांच्या पार

 


 


 भारतात कोरोनाचे थैमान ; देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55 लाखांच्या पार


 


 देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. आता गेल्या 24 तासांत समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55 लाखांच्या पार पोहोचली आहे.


 


आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरात मागील चोवीस तासांमध्ये 75 हजार 83 नवे करोनाबाधित आढळले असून, 1 हजार 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची एकूण संख्या 55 लाख 62 हजार 664 वर पोहचली आहे. या करोनाबाधितांमध्ये 9 लाख 75 हजार 81ॲक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले 44 लाख 97 हजार 868 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 88 हजार 935 जणांच्या संख्येचा समावेश आहे.


 


जगातील इतर देशांच्या तुलनेत कोरोनाच्या संसर्गात भारत वेगाने पुढे जात असल्याने निर्माण ही चिंतेची बाब आहे. मात्र गेल्या तीन दिवसांत 90 हजार रुग्ण बरे झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या सलग तीन दिवसांच्या आकडेवारीमुळं भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


 


Post a Comment

Previous Post Next Post