आटपाडी तालुक्यात आज दिनांक १४ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ५५ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु असून आज दिनांक १४ रोजी तालुक्यात तब्बल ५५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
आज आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये १८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आवळाई २ नवे रुग्ण, भिंगेवाडी १ नवा रुग्ण, दिघंची ३ नवे रुग्ण, निंबवडे १६ नवे रुग्ण तर राजेवाडी येथे १५ नवे रुग्ण आढळून आले असून तालुक्यात एकूण ५५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
आजच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णामध्ये स्त्री २३ रुग्ण व पुरुष ३२ रुग्ण असे एकूण असे ५५ नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज