जतचे आमदार विक्रम सावंत कोरोना पॉझिटिव्ह

जतचे आमदार विक्रम सावंत कोरोना पॉझिटिव्ह


 


जतचे आमदार विक्रम सावंत कोरोना पॉझिटिव्हजत : जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली माझ्या संपर्कात आलेले पदाधिकारी, व नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले. आमदार सांवत, त्यांचे चिरंजिव, चालक यांनाही कोरोनाची हलकी लक्षणे आढळून आल्याने, त्यांचा कोरोना चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना विलगीकरण करण्यात आले आहे.माझी तब्येत ठणठणीत आहे. जनतेनी माझी काळजी करू नये. तालुक्यात मोठ्या झपाट्याने वाढत असलेल्या कोरौनापासून स्व:तासह कुंटुबियांचा बचाव करण्यासाठी सतर्क रहावे. जत तालुक्यात कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी बेडची संख्या वाढविण्यासाठी युध्द पातळीवर काम सुरू आहे. 


त्याशिवाय शहरातील दोन खाजगी हॉस्पिटल कोविड सेंटर करण्यात आले आहेत. तेथे दोन दिवसात उपचार सुरू होतील. शहरातही ग्रामीण रुग्णालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृह येथे कोरोना बाधित रुग्णावल तातडीने उपचार करावेत अशा सुचना दिल्या आहेत. टेस्टची संख्या वाढविण्यात आली आहे.औषधाचा साठा वाढविण्यात आला आहे.सर्व स्थानिक प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याचेही आमदार सांवत यांनी सांगितले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments