आजचा वाढदिवस : लता मंगेशकर ; लतादिदींचा अनोखा प्रवास

आजचा वाढदिवस : लता मंगेशकर ; लतादिदींचा अनोखा प्रवास


 


आजचा वाढदिवस : लता मंगेशकर ; लतादिदींचा अनोखा प्रवासमुंबई : भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. बॉलिवूडसह देशविदेशातील विविध भाषांतील गाण्यांना आपल्या आवाजाने स्वरबद्ध करणाऱ्या लतादिदी आज 91 वर्षांच्या झाल्या आहेत. वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर बॉलिवूड, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गायनाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके अवार्ड सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे.लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते. लता मंगेशकर अर्थात लतादिदींनी आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर 'गानकोकिळा' अशी बिरुदावली आपल्या नावासमोर मिळवली.त्यांनी हजारहून अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत. तर अनेक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये देखील गायन केले आहे. 2001 साली त्यांना 'भारतरत्नन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत. 1974 ते 1991 च्या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments