Type Here to Get Search Results !

आजचा वाढदिवस : एकनाथराव खडसे (जेष्ठ भाजप नेते, माजी महसूलमंत्री)


 


आजचा वाढदिवस : एकनाथ खडसे (जेष्ठभाजप नेते, माजी महसूलमंत्री)शेतकरी कुंटूबात जन्मलेले एकनाथराव खडसे सध्या भाजपचे जेष्ठ नेते असले तरी आता त्यांची ओळख भाजपचे नाराज नेते अशीच आहे. विधानसभेवर सहा वेळा मुक्ताईनगर (जि.जळगाव) मतदार संघातून निवडून आले आहेत. परंतु यावेळच्या निवडणुकीत त्यांना पराभव स्विकारावा लागला. सरपंच ते राज्याचा विरोधी पक्षनेता, मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. एक लढवैय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे.शेतकरी कुंटूबात जन्मलेले आमदार एकनाथराव खडसे भाजपचे नेते आहेत. विधानसभेवर सहा वेळा मुक्ताईनगर (जि.जळगाव) मतदार संघातून निवडून आले आहेत. सरपंच ते राज्याचा विरोधी पक्षनेता, मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. एक लढवैय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वसामान्य नागरिक ते शेतकऱ्यांच्या प्रश्नापसाठी त्यांनी रस्त्यापासून तर थेट विधीमंडळात त्यांनी आवाज उठविला आहे. ज्या विधासभेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी राज्यातील विविध प्रश्नालला त्यांनी वाचा फोडली आहे. या शिवाय सन 1997 मध्ये राज्याचे जलसंपदा मंत्रीपद त्यांच्याकडे असतांना त्यांनी कृष्णा खोरे, तापी खोरे विकास महामंडळाची स्थापना करून सिचनांच्या कामांना गती दिली. सन 2014 मध्ये झालेल्या निवडणूकीत गेल्या पंचवीस वर्षापासून युती असलेल्या शिवसेनेशी युती तोडून भारतीय जनता पक्ष स्वातंत्र लढला आणि प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून राज्यात निवडून आला. त्यात त्यांचा वाटा मोठा होता. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा होती तशी त्यांनी पंढरपूर येथे इच्छा बोलून सुद्धा दाखविली होती.परंतु त्यांना महसूल खात्यासह दहा खात्याचे मंत्रीपद देण्यात आले. मात्र अवघे दीड वर्षाच्या काळात गैरव्यवहाराच्या आरोपावरून त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु त्यानंतर झालेल्या चौकशीत ते निर्दोष असल्याचा सांगण्यात येत असले तरी भाजपने त्यांचे पंख छाटण्याचे कामच केले आहे. अगदी त्यांच्या पराभवात देखील भाजपचे सध्याचे नेते असल्याचे बोलले जाते.पराभवानंतर त्यांना राज्यसभा किंवा विधानपरिषदेवरती घेण्यात येईल अशी त्यांची व त्यांच्या समर्थकांची मोठी आशा होती. परंतु त्या सर्व आशा-आकांशा फोल ठरवित भाजपने त्यांना ठेंगा दाखवित युवा कार्यकर्त्यांना संधी दिल्याने ते भाजपवर नाराज झाले होते. परंतु सध्या अजून तरी यांनी पक्ष सोडलेला नाही.
भाजपची पाळेमुळे तळागाळातील लोकापर्यंत पोहचविण्याचे प्रामाणिक काम त्यांनी केले. अशा या लढवय्या नेत्याला माणदेश एक्सप्रेस परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.....


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies