लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका : मुख्यमंत्री ठाकरे


 लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका : मुख्यमंत्री ठाकरे


मुंबई : ग्रामीण भागात आता कोरोना वाढत चालला आहे. दुसरी लाट आली की काय अशी भीती आहे. हे संकट वाढत आहे त्यामुळं आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका. काही गोष्टी आपण जबाबदारीनं पाळल्या पाहिजेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या, सध्या गाजत असलेलं कंगना प्रकरण आणि त्यावरुन सुरु असलेलं राजकारण तसंच मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आजपर्यंत सरकार म्हणून आम्ही दिलेल्या सूचनांचे तुम्ही पालन केले आहे, तसेच यापुढे देखील आपण एकीने युध्द जिंकू. कोरोना संकटाच्या काळात थोडासा संयम पाळा, असं मुख्यमंत्री म्हणाले.


 


माझे कुटुंब-माझी जबाबदारी योजना 


 


ग्रामीण भागात आता कोरोना वाढत चालला आहे. दुसरी लाट आली की काय अशी भीती आहे. हे संकट वाढत आहे त्यामुळं आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. आधी मी बोललो होतो 'तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो' पण आता मी तुमच्यावरही जबाबदारी टाकत आहे. आपण आपल्या परिवाराची जबाबदारी घ्यायची आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही योजना सुरु करत आहोत. कोरोनावर मात करण्यासाठी ही नवी मोहीम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 


 


राज्यातील 12 कोटी जनतेची चाचणी अशक्यप्राय, प्रत्येक घरात आरोग्याची चौकशी करायला दोन वेळा टीम जाईल, प्रत्येक लोकप्रतिनिधीने जबाबदारी घ्यावी, 50-55 वर्षावरील व्यक्तीची ऑक्सिजन मात्रा आणि अन्य व्याधी / लक्षणांची माहिती घ्या व यंत्रणेस कळवा. फेस टु फेस बोलु नका. ऑनलाइन खरेदीवर भर द्या. दुकानात गर्दी करू नका, सॅम्पलना हात लावू नका. सार्वजनिक वाहनातून फिरताना बोलू नका. ऑक्सिजन कमतरता जाणवत आहे. त्यामुळे 80% ऑक्सिजन हा प्रथम आरोग्य सेवेसाठी देणार, उद्योगासाठी देण्यास दुय्यम महत्त्व देण्यात येणार. नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या-आपल्या विभागाची जबाबदारी घ्यावी, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured