मराठी चित्रपट सृष्टीत ‘हे’ कलाकार कोरोना पॉझिटिव्ह


 


मराठी चित्रपट सृष्टीत ‘हे’ कलाकार कोरोना पॉझिटिव्हमुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीनंतर आता मराठी चित्रपट सृष्टीत सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीत चिंतेचे वातावरण आहे.अभिनेता व निर्माता सुबोध भावे नंतर आता आणखीन सहा मराठी कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आहे. झी युवा वर सुरु झालेल्या सिंगिंग स्टार या सेलिब्रिटी रिअॅंलिटी शो मध्ये सहभागी झालेले अभिजीत केळकर व पुर्णिमा डे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अभिजीतने या संदर्भात एक पोस्ट सुद्धा इन्स्टाग्राम वर शेअर केली आहे. तसेच याच सेटवरचे रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. 
तसेच या शोच्या सेटवरील 2 क्रू मेंबर्स सुद्धा कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे आता 10 सप्टेंबर पर्यंत शोचे शुटींग बंद असणार असल्याचे समजते आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

Previous Post Next Post