Covid-19  महामारी मुळे ग्रामीण भागात कोरोनाचे थैमान 

Covid-19  महामारी मुळे ग्रामीण भागात कोरोनाचे थैमान 


Covid-19  महामारी मुळे ग्रामीण भागात कोरोनाचे थैमान माणदेश एक्सप्रेस न्युज आटपाडी ; Covid-19  महामारी मुळे भारतात कोरोना चे थैमान चालू असून सध्या ते ग्रामीण भागात पसरले आहे. प्रबोधन करून सुद्धा आटपाडी कर काळजी घेत नसल्याने नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असून बरेच लोक मास्कचा वापर करत नसल्याचे चित्र आहे. सध्या कोणतेही लॉकडाऊन नसल्याने शहरात अनेक ठिकाणी गर्दी वाढत असून रोजच बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे, मात्र पोलिस दिसताच लोक मास्क घालत आहेत त्यामुळे भीती राहिलेले नाही म्हणून कोरोना चा प्रचार व प्रसार जोमाने होताना दिसून येत आहे. तसेच वकील संघटनेचे सदस्य ही या कोरोनाच्या संकटात येत असल्याने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने आटपाडी वकील संघटनेने आपत्ती व्यवस्थापन समिती सरपंच ग्रामपंचायत आटपाडी यांना निवेदन दिले असून वरील सर्व गोष्टींचा विचार करून आटपाडी येथील सर्व वकील सदस्यांना ग्रामपंचायतीमार्फत आवश्यक ते साहित्य, औषधे देण्यात यावी व सर्व उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात अशी विनंती करण्यात आली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments