आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 


आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आज पुन्हा एकदा तालुक्यात खळबळ माजली आहे. आज आलेल्या नवीन रूग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील एका नामंकित कापड दुकानदार, पेंटर व त्यांची सून कोरोना पॉझीटिव्ह आले आहेत. तालुक्यामध्ये आजच्या नवीन रूग्णा मध्ये उंबरगाव येथे ६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कामथ १ रुग्ण, राजेवाडी २ रुग्ण, शेटफळे २ रुग्ण, निंबवडे २ रुग्ण, दिघंची १३ रुग्ण, तडवळे २ रुग्ण, बोंबेवाडी ३ रुग्ण, कौठूळी ४ रुग्ण, झरे २ रुग्ण वलवण १ असे एकूण ४२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. सदर रूग्णापैकी २८ रुग्ण हे पुरुष असून १९ रुग्ण ह्या स्त्री आहेत.तर आटपाडी तालुक्यात कोरोना टेस्ट झालेल्या व तालुक्याबाहेरच्या असणाऱ्या माण तालुक्यात काळचौंडी येथील ३ रुग्ण, खानापुर तालूक्याती भूड येथील १ रुग्ण व सांगोला तालुक्यातील कोळे येथील १ रुग्ण यांचा कोरोना पॉझीटिव्ह रूग्णामध्ये समावेश आहे. 


 
वाढत असणाऱ्या रूग्णामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घावी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. नेहमी मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टस्निंगचे पालन करावे व काम असेल तरच घरातून बाहेर पडण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी नागरिकांना केले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured