स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांच्या नंतर त्यांच्या पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार कोरोना पॉझिटिव्ह

 स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांच्या नंतर त्यांच्या पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार कोरोना पॉझिटिव्ह


 


अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नंतर त्यांच्या पक्षातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व वरुड मोर्शी मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून  खळबळ उडाली आहे.


 


आमदार देवेंद्र भुयार यांची प्रकृती बिघडली असल्याने पुढील उपचारासाठी अमरावती वरून नागपूरच्या दिशेने रवाना ते झाले आहेत. देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रात एकमेव आमदार असून हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीच देवेंद्र भुयार यांचा रिर्पोट हा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ते मुंबईच्या अधिवेशनात उपस्थित नाहीत. भुयार यांना दोन दिवसांपासून ताप, खोकला असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला.


 


देवेंद्र भुयार यांनी विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजपचे कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. त्यामुळे मंत्र्यांचा पराभव करून त्यांनी विजय मिळवला असल्याने राज्यभर त्यांची चर्चा आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments