अभिनेत्री कंगना रणौत चा रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विकी कौशल यांच्यावर निशाना


 


अभिनेत्री कंगना रणौत चा रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विकी कौशल यांच्यावर निशाना


 


मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत  बॉलिवूडमधील अनेकांवर सध्या निशाणार साधत आहे. करण जोहर, आदित्य चोप्रा, अनुभव सिन्हा यांच्यावर टीका केल्यानंतर आता पुन्हा एकदा तिने तिचा मोर्चा बीटाऊनच्या नवीन पिढीकडे वळवला आहे.


 


तिने बॉलिवूडमधील ड्रग्न संदर्भात भाष्य केले आहे. कंगनाने नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'मी रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विकी कौशल यांना विनंती करते की त्यांनी ड्रग तपासणीसाठी त्यांच्या रक्ताचा नमुना द्या, असे चर्चेत आहे की ते कोकेनच्या आहारी गेले आहेत. त्यांनी या अफवा खोट्या ठरवाव्यात असे मला वाटते. या तरुणांचे सँपल्स क्लीन निघाले तर ते लाखो लोकांची प्रेरणा ठरतील.


 


कंगनाच्या या ट्वीटवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी तिला पाठिंबा दिला आहे तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे. दरम्यान याआधी तिने ड्रग्ज संदर्भात केलेल्या आणखी एका ट्वीटमधून दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यावर देखील कठोर शब्दात टीका केली होती.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

Previous Post Next Post