आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  माण मतदार संघात  आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप ; आकाशबाबा माने मित्रपरिवाराचा उपक्रम 

माणदेश एक्सप्रेस टीमम्हसवड/अहमद मुल्ला : दिनांक २९ रोजी राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माण-खटाव मतदारसंघात माण खटाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनाथ आश्रमात विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपण ही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.रोहित पवार यांनी वाढदिवसाला हार-तुरे व बॅनरचा खर्च न करता इतर सामाजिक उपक्रम करावे असे आवाहन केले होते. या आवाहनाला साथ देत रोहित पवारांचे  म्हसवड येथील समर्थक व निकटवर्तीय आकाशबाबा माने यांनी प्रभाकर देशमुखसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम गेली दोन वर्षे चालवला आहे. येणाऱ्या काळात आमदार रोहित पवार यांच्या सहकार्याने व प्रभाकर देशमुख यांच्या माध्यमातून म्हसवड परिसरात शैक्षणिक क्षेत्रात मदत करणार असल्याचे आकाशबाबा माने म्हणाले. आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सौ.सुनंदाताई पवार यांनी या उपक्रमाबद्दल अकाशबाबा माने यांचे फोन वरून आभार व्यक्त केले व कौतुक केले. यावेळी आकाशबाबा माने, आदर्श कलढोणे, आकाश राऊत, डॉ सौरभ सावंत, माऊली खटावकर, अमितदादा माने, विशाल सावंत व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments