भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३९ वर

भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३९ वर

 भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३९ वरठाणे : भिवंडीतील इमारत कोसळून जी दुर्घटना घडली त्या घटनेतील मृतांच्या आकड्यात वाढ झाली असून या घटनेतील मृतांचा आकडा ३९ वर पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बचावकार्य चालू आहे. आतापर्यंत २५ जणांची सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसेच NDRF चे जवान मदतकार्यात गुंतले आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये सोमवारी पहाटे तीन मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या भयंकर घटनेत अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. ही इमारत ४३ वर्ष जुनी होती. या तीन मजली इमारतीतील ४० फ्लॅट्समध्ये १५० रहिवाशी वास्तव्यास होते. सदर इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती, असे भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.या घटनेचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देत आढावा घेतला होता. दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments