महिम येथील ओढ्यावरील पुल गेला वाहून ; सभापती राणीताई कोळवले यांनी केली पाहणी

महिम येथील ओढ्यावरील पुल गेला वाहून ; सभापती राणीताई कोळवले यांनी केली पाहणी


 


महिम येथील ओढ्यावरील पुल गेला वाहून ; सभापती राणीताई कोळवले यांनी केली पाहणी
माणदेश एक्सप्रेस टीमअजनाळे/सचिन धांडोरे : सांगोला तालुक्यातील महिमला जाणाऱ्या खंडोबा मंदिराजवळ रस्ता वाहून गेला आहे. तर येथील ओढ्यावरील दगडी पूल वाहून गेल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहत असल्यामुळे याठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण झाली होती याची तात्काळ दखल घेऊन सांगोला पंचायत समितीच्या सभापती राणीताई कोळवले यांनी गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना केल्या. त्याचबरोबर महुद येथील बौद्ध समाज स्माशनभुमी वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याठिकाणी भेट देवून पहाणी केली. याप्रसंगी बांधकाम विभागाचे श्री. मुळीक, युवा नेते नानासाहेब गाडवे, बंडू पाटील, विकास पाटील, दिनेश बंडगर, बिरु माने यांच्यासह अन्य अधिकारी ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments