“ तर मग अमिर खान तुर्कस्थानाहून अल्लाउद्दीनच्या चटईवर बसून मुंबईत आला होता का?,” मुंबईच्या महापौरांवर भाजपची टीका 

मुंबई विमानाने मुंबईत दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला पालिकेच्या सुधारित आदेशांनुसार १४ दिवस विलगीकरणात राहावेच लागेल. सर्वासाठी नियम समान आहे. त्यातून सूट हवी असल्यास सरकारी अधिकाऱ्यांनी अर्ज करावा, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोणाचेही नाव न घेता स्पष्ट केलं होतं. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनेता अमिर खानचा संदर्भ देत महापौर किशोरी पेडणेकर यांना टोला लगावला.

“ कंगना बाहेरून विमानाने येणार म्हणून तिला क्वारंटाइन करणे अनिवार्य असल्याचं मुंबईच्या महापौरांनी सांगितलं. परंतु अमिर खान तुर्कस्थानाहून अल्लाउद्दीनच्या चटईवर बसून मुंबईत आला होता का?,” असा सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

कंगना बाहेरून विमानाने येणार म्हणून तिला क्वारंटाईन करणे अनिवार्य:
BMC महापौर मॅडम
अमीर खान टर्कीहुन.. अल्लादिनच्या चटईवर बसून आला होता का मुंबईत ? 🤣😂

— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 9, 2020

त्यामुळे सध्यातरी कंगना रनौत व सरकार यांच्यात होत असलेल्या टीका-टिप्पणी मुळे राजकीय मनोरंजन होत असले तरी बाकीच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष कमी होत असल्याचे चित्र निर्माण करण्यात भाजप यशस्वी होताना सध्या तरी दिसत नाही.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments