घरेलू कामगार महिलांच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करु: महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

घरेलू कामगार महिलांच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करु: महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 घरेलू कामगार महिलांच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करु: महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूरमुंबई, दि. 24: कोरोना परिस्थितीमुळे विविध समस्यांना तोंड देत असलेल्या घरेलू कामगार महिलांच्या शिष्टमंडळाने काल महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. या महिलांना त्यांच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाहीदेखील ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिली.राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष सुशीबेन शहा यांच्यासह घरेलू कामगार महिलांच्या शिष्टमंडळाने मंत्री ॲड. ठाकूर यांची भेट घेतली.घर स्वच्छता कामातील महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे या कामगार महिलांचे अनेक कुटुंबांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात. मात्र, कोरोना परिस्थितीत लॉकडाऊन कालवधीमध्ये अनेक महिलांना रोजगाराला मुकावे लागले. दररोज कामावर गेल्याशिवाय कमाई होत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे अनेक महिलांना आर्थिक हालाखीला सामोरे जावे लागले. आता परिस्थितीमध्ये थोडीफार सुधारणा होत असली तरी या महिलांच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आहे, असे श्रीमती शहा यांनी सांगून घरेलू कामगारांसाठी सुरू करण्यात आलेले घरेलू कामगार कल्याण मंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करुन त्यामार्फत या कामगांच्या कल्याणाचे निर्णय घेतले जावेत, अशी मागणी केली.घरेलू कामगार महिला या समाजाचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे यावेळी ॲड. ठाकूर म्हणाल्या. या महिलांचे आरोग्य, पोषण, मुलांचे शिक्षण, त्यांचे हक्क आदींसाठी शासन सकारात्मक पावले उचलेल, असे आश्वासनही त्यांनी शिष्टमंडळाला दिले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments