आटपाडी तालुक्यात लॉकडाऊन कधी होणार

आटपाडी तालुक्यात लॉकडाऊन कधी होणार


 


आटपाडी तालुक्यात लॉकडाऊन होणार का? व्यापाऱ्यांची-नागरिकांची मोठ्या प्रमाणात चर्चा  
सांगली :  जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची आवश्यकता आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्याने आटपाडी तालुक्यात चर्चेला जोर आला असून हॉटेल, चौका-चौकात लॉकडाऊन होणार का? याबाबत चर्चा होत आहेत.


 


 सध्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधला. जयंत पाटील म्हणाले, सध्या उपलब्ध असलेली साधनसाम्रगी, व्यवस्था पाहता, रुग्णसंख्या आवाक्याबाहेर जात आहे. रुग्णांना बेड न मिळणे, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर न मिळणे अशा गोष्टी होत आहेत. साधनसामग्रीच्या तुटवड्यामुळे नियोजन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे संसर्ग साखळी तुटणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी केलेल्या लॉकडाऊनचा फारसा उपयोग झाला नाही. लोक कोरोनाबद्दल गाफील आहेत. सुरक्षित अंतराचे पालन करण्यास ते टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे संसर्ग कमी होण्या ऐवजी वाढतच आहे.


 


 आटपाडी तालुक्यात आज रोजी कोरोना रुग्णांनी ५०० चा आकडा ओलंडला आहे. तालुक्यातील दिघंची व आटपाडी शहरामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण सापडू लागले आहेत. तर प्रशासनातील काही कर्मचारी कोरोनाग्रस्त बनल्याने आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. शहरामध्ये अजूनही मोठ्या संख्येने व्यापारी पेठेत, बाजार पटांगण, बस स्थानक परिसर आदी ठिकाणी नागरिक गर्दी करीत आहेत. त्यातच शहरातील एका नामंकित व्यापाऱ्याला व त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याने अनेक नागरिकांचे मत आहे. परंतु पालकमंत्री काय निर्णय घेणार याकडे आटपाडीकरांचे लक्ष लागले आहे.


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


 


Post a comment

0 Comments