जळभावी येथे जनकल्याण फौंडेशन व जनशक्ती संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न 


 


जळभावी येथे जनकल्याण फौंडेशन व जनशक्ती संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न 
माणदेश एक्सप्रेस टीममाळशिरस/स्वप्निल राऊत : मौजे जळभावी ता. माळशिरस येथे दि. ७ रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित जनकल्याण ग्रामविकास प्रतिष्ठान व भानुदास चोरमले जनशक्ती मित्र बहुउद्देशीय संस्था सर्व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते  पांडुरंग (तात्या) वाघमोडे यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान मंदिर जळभावी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.सादर शिबिराला लोकांचा मोठा प्रतीसाद्र मिळाला या शिबिरामध्ये 49 जणांनी रक्तदान केले. जळभावी गावांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम हाती घेऊन राबविले जातात. गावचे उपसरपंच बापू राऊत, तसेच बापू शिंदे, ग्रामपंचायत सदस्य तसेच जनकल्याण ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आजिनाथ सरगर, भानुदास चोरमले, जनशक्ती मित्र बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष तथा तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील रावसाहेब सुळ, ललिता चोरमले, कविता धाईजे, आप्पासाहेब सुळ, माजी सरपंच नंदकुमार धाईजे, उपसरपंच सर्जेराव चोरमले तसेच इतर सर्वच ग्रामस्थांनी या शिबिरास मोलाचे सहकार्य करून रक्तदान शिबिर यशस्वी केले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

Previous Post Next Post