कारंडेवस्ती ते बेरगळवाडी जाणारा रस्ता गेला वाहून डॉ. भूमिका बेरगळ यांनी जाऊन केली पुलाची पाहणी

कारंडेवस्ती ते बेरगळवाडी जाणारा रस्ता गेला वाहून डॉ. भूमिका बेरगळ यांनी जाऊन केली पुलाची पाहणी


 


कारंडेवस्ती ते बेरगळवाडी जाणारा रस्ता गेला वाहून डॉ. भूमिका बेरगळ यांनी जाऊन केली पुलाची पाहणीआटपाडी : वलवण येथील कारंडेवस्ती ते बेरगळवाडी जाणारा रस्ता वलवण येथील शिंदेनगर येथील रस्त्यावरचा पूल कॅनॉलच्या पाण्यामुळे व सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वाहून गेला आहे. शिवाय या वस्ती वरून वलवणकडे जाणारा सुमारे चार किलोमीटरचा रस्ता व बेरगळवाडीला जाणारा सुमारे तीन किलोमीटर रस्ता अतिशय खराब झाला आहे. वलवण येथील कारंडेवस्ती येथील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. आटपाडी पंचायत समितीच्या सभापती डॉ. भूमिका बेरगळ यांनी जाऊन पुलाची पाहणी करून ताबडतोब उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. 


 


यावेळी वलवण गावचे सरपंच दगडू गेजगे, उपसरपंच मारुती जाधव, ग्रामपंचायत सदस्य शरद कारंडे, पोलीस पाटील सुहास शिंदे, ग्रामसेवक गिरीश पांढरे, वलवण गावातील नागरिक आत्माराम शिंदे, विजय कारंडे, अमोल कारंडे, अशोक जाधव, तानाजी पोळ, सुखदेव शिंदे, राजाराम शिंदे आदी उपस्थित होते. दरम्यान, येथील संपूर्ण रस्ता वाहून गेला आहे.


तसेच टेंभूचे पाणी सुटल्यानंतर रस्ता पाण्याखाली जातोय. त्यामुळे नागरिकांना ये-जा करता येत नाही. याबाबत आमदार अनिल बाबर, सभापती डॉ. भूमिका बेरगळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून लवकरच पुल बांधून देण्याचे आश्वासन दिले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


 


Post a comment

0 Comments