ई-पास रद्द : सरकारकडून UNLOCK 4 च्या गाईडलाईन्स केल्या जाहीर ; काय सुरू होणार काय बंद राहणार पहा सविस्तर


 


ई-पास रद्द : सरकारकडून UNLOCK 4 च्या गाईडलाईन्स केल्या जाहीर ; काय सुरू होणार काय बंद राहणार पहा सविस्तरमुंबई : राज्य सरकारनं अनलॉक-4 च्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी यापुढे ई-पास बंधनकारक नसेल, अशी माहिती महाराष्ट्र सरकारनं देण्यात आली आहे. Unlock चा चौथा टप्पा 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या तीन टप्प्यांपेक्षा अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात आणखी नियम शिथिल करण्यात आले आहेत.
मुंबईत विमानांची उड्डाण आणि लँडिंगची संख्या 1 सप्टेंबरपासून दुप्पट करण्यात येणार आहे. आतापर्यंत एकूण 100 विमानांच उड्डाण आणि लँडिंग होतं, आताही संख्या दुप्पट होणार आहे. त्याचबरोबर जिल्हा अंतर्गत प्रवासासाठी ईपासची गरज नाही.
 • काय सुरू होणार काय बंद राहणार
  हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार
  शाळा आणि कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार
  30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही
  खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा
  सिनेमागृह 30 सप्टेंबरपर्यंत राहणार बंद
  मंदिर आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाहीदरम्यान, 1 जूनच्या तुलनेत 1 सप्टेंबरमध्ये अर्थव्यवस्थेतील अनेक घटक आणि सुविधा सेवा सुरळीत सुरू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवीन गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या होत्या. त्यावर राज्य सरकारने निर्णय घेऊन नियमावली जाहीर केली आहे


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

Previous Post Next Post