शेतकऱ्यांना पीककर्ज भेटेना म्हणून आमदाराची गांधीगिरी, चक्क धुतले बँक अधिकाऱ्याचे पाय! पहा VIDEO


 


शेतकऱ्यांना पीककर्ज भेटेना म्हणून आमदाराची गांधीगिरी, चक्क धुतले बँक अधिकाऱ्याचे पाय! पहा VIDEO


 


बीड : भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी थेट बँक अधिकाऱ्याचे पाय धुवून फुले वाहून त्यांना गमचाचा आहेर चढविला आहे. आणि त्याचे कारण देखील तसेच आहे. हा सर्व प्रकार बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घडला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.


पहा VIDEO 


आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथील बँकेच्या शाखेमध्ये बारा गावातील शेतकऱ्यांची सतराशे पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. शेतकरी खेटे मारून दमले पण मंजुरी मिळत नाही.अनेकदा सांगून देखील बॅकेचे अधिकारी ऐकत नसल्याने भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या बँकेच्याच अधिकाऱ्याचे पाय धुवून विनंती करत गांधीगीरी केली पाय धुवून त्यावर फुले वाहून बॅक अधिकाऱ्यास गमचाचा आहेर केला आहे. यापेक्षा आम्ही तुमचे जास्त काही करू शकत नाहीत, असेही सुरेश धस यावेळी बोलताना म्हणाले आहेत.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured