मनसेच्या प्रमुख नेत्याने घेतली कंगनाची बाजू, शिवसेनेवर टीका, पाहा हा VIDEO

मनसेच्या प्रमुख नेत्याने घेतली कंगनाची बाजू, शिवसेनेवर टीका, पाहा हा VIDEO


 


मनसेच्या प्रमुख नेत्याने घेतली कंगनाची बाजू, शिवसेनेवर टीका, पाहा हा VIDEOमुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केल्यामुळे वादंग उठला आहे. शिवसेनेसह मनसेनंही कंगना राणावतच्या या भूमिकेला विरोध केला आहे. पण, दुसरीकडे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कंगनाची बाजू घेतल्याचे समोर आले आहे.'राज्यातील मंदिर बंद आहे. मंदिरं सुरू करावी अशी मागणी होत आहे. लॉकडाउनच्या काळात लाखो लोकं बेरोजगार झाले आहे.  आरोग्य व्यवस्था चांगली नसल्यामुळे हजारो लोकांचा बळी जात आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरातच बसून काम करत आहे. रेल्वे सेवा बंद आहे त्यामुळे हजारो लोकांचे हाल होत आहे' अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केली केली.


पाहा हा VIDEO
दुसरीकडे एका व्यक्तीच्या वक्तव्याला 5 पैशांची किंमत नाही. अशा व्यक्तीला महत्त्व देण्याची गरज आहे का? प्रसिद्धी मिळवण्यासाठी कंगनाने बेताल वक्तव्य केले आहे, त्याला इतके महत्त्व देण्याची गरज आहे का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थितीत केला.कंगनाने प्रसिद्धी मिळवण्यासाठी फास फेकला आहे. यात शिवसेना स्वत: ला का अडकवून घेत आहे. शिवसेनेनं या जाळ्यात फसावे इतकी  र्निबुद्ध झाली आहे का? मुख्य विषयापासून लक्ष्य दूर करण्यासाठी शिवसेनेकडून विरोध सुरू आहे, अशी टीकाही देशपांडे यांनी केली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments