माजी आमदार दिलीपराव माने यांची सोलापूर जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी निवड

माजी आमदार दिलीपराव माने यांची सोलापूर जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी निवड


 


सोलापूर जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी माजी आमदार दिलीपराव माने यांची निवड


 


सोलापूर :  सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदी माजी आमदार दिलीपराव माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 


 


आज बुधवारी जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था ( दूध) सुनील शिरापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. 


 


चेअरमन निवडीसाठी चर्चा करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार व माजी मंत्री दिलीप सोपल, माजी आमदार दिपक साळुंखे, माजी आमदार राजन पाटील, आमदार संजयमामा शिंदे, मंगळवेढा तालुक्याचे नेते बबनराव आवताडे यांची बैठक झाली. या बैठकी अगोदरच आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार दिलीपराव माने यांची नावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुचविली होती. परंतु आमदार संजय शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संघासाठी वेळ देऊ शकत नसल्याचे सांगत पवार यांनी दिलीपराव माने यांना चेअरमन करण्यास सुचविले. 


 


संघाच्या संचालकांशी चर्चा केल्यानंतर दिलीपराव माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. संघाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत एकमताने माने यांची निवड करण्यात आली.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments