Type Here to Get Search Results !

आटपाडीत दमदार पावसाने शुक्र ओढा भरून वाहिला


 


आटपाडीत दमदार पावसाने शुक्र ओढा भरून वाहिला 
माणदेश एक्सप्रेस न्युज



आटपाडी/प्रतिनिधी : काल आटपाडी शहरासह तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी काही प्रमाणात सुखावला असला तरी पावसाने पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने हतलब ही झाला आहे.
काल दूपार पासूनच उकाड्याने आटपाडीकर हैराण झाले होते. दुपारी २ च्या सुमारास पावसाचे आगमन झाले परंतु लगेच पाऊस बंद झाल्याने पुन्हा हवेमध्ये मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झाला.


 



 


मात्र रात्री पुन्हा ९.२० ला सुरु झालेला पाऊस रात्री ११.३० पर्यंत एकसारखा दमदार पडला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले.  दमदार पावसाने आटपाडीच्या शुक्र ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले. रात्री १.३० वाजता आटपाडी बाजार पटांगण येथील शुक्र ओढ्यावरील पुलावरून काही प्रमाणात पाणी वाहू गेले. 



यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने ओढ्याला पाणी आले. टेंभू योजनेचे सुरु असलेले पाणी व पावसाचे पाणी यामुळे शुक्र ओढ्याला रात्री पूर आला होता. यावेळी बराच वेळ पाणी पुलाबरोबर वाहत होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies