Type Here to Get Search Results !

वैद्यकीय अधीक्षक डॉ. तांबोळी यांनी स्वतः हाकली रुग्णवाहिका ; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल


वैद्यकीय अधीक्षक डॉ. तांबोळी यांनी स्वतः हाकली रुग्णवाहिका ; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल


माणदेश एक्सप्रेस टीम


 


आटपाडी/धिरज प्रक्षाळे : ग्रामीण रुग्णालय आटपाडी येथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तांबोळी यांनी कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असणारा ऑक्सिजनचा साठा आणण्यासाठी, चालक रजेवर असल्यामुळे स्वतः रुग्णवाहिका चालवली व रुग्णांना ऑक्सिजन पोहोच केला. त्यांचा तो व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून चर्चेत आला आहे. 


 


कोविड सेंटर व ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करत असताना वैद्यकीय अधीक्षक पदावर  कार्यरत डॉ. तांबोळी व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. आता डॉ. तांबोळी पूर्ण कोरोनामुक्त झालेले असले तरी अन्य सहकारी डॉक्टर व स्टाफ कोरोनाबाधित झालेले आहेत.


 



 


स्वतः औषधोपचार घेत असलेतरी विलागीकरन केलेल्या अवस्थेत दूरध्वनीवरून लोकांना जागरूक राहण्यासाठी सतर्कता व काळजी घेण्यास मार्गदर्शन करीत आहेत. 


 


स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या या कोविड योद्ध्यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. नागरिकांनी स्वतःवर संयम ठेवून विषाणू संसर्ग होवू नये यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे, तसेच वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय व्यावसायिक यांच्याशी गैरवर्तन न करता, समजूतदारपणे वागणे गरजेचे आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies