तुळजापूरचा नवरात्रोत्सव रद्द ;  जिल्हाधिकारी व मंदिर संस्थानचा निर्णय


 


तुळजापूरचा नवरात्रोत्सव रद्द ;  जिल्हाधिकारी व मंदिर संस्थानचा निर्णयतुळजापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं नवरात्र महोत्सव रद्द करण्यात आला आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थानच्या बैठकीत हा निर्णय घेतला. जागतिक महामारी कोरोनाचा फटका तुळजाभवानी मातेच्या वर्षातील सर्वात मोठा उत्सव शारदीय नवरात्र महोत्सवाला बसला आहे. गर्दी टाळण्यासाठी नवरात्र महोत्सव कालावधीत भाविकांना शहराबाहेरच अडविण्यात येणार आहे. मंदिर बंद असल्याने पुजारी, व्यावसायिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. सर्वांच्या आशा आगामी नवरात्र महोत्सवावर होत्या. मात्र, नवरात्र महोत्सवही भाविकांशिवाय होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने पुजारी, व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.नवरात्र महोत्सवात दिवस रात्र भाविकांची प्रचंड वर्दळ असल्याने सर्वांचा चांगला व्यवसाय होतो. नवरात्र महोत्सवाच्यानंतर दीपावलीच्या सुट्टीतही भाविकांची मोठी गर्दी असते. नवरात्र महोत्सवातील केवळ 15 दिवसांच्या व्यवसायावर दुकानदार, दुकानांचे भाडे तसेच व्यापाऱ्यांची देणी भागवत असतात तर बाकी वर्षभर नफा कमावला जातो. मात्र, नवरात्रच होणार नसल्याने दुकानांचे भाडे, व्यापाऱ्यांची देणी कशी द्यायची? ही चिंता व्यावसायिकांना सतावत आहेत.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured