सांगलीचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी नियुक्ती 


 


सांगलीचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी नियुक्ती 
माणदेश एक्सप्रेस न्युज


 


आटपाडी : सांगलीचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीत असताना त्यांनी जिल्ह्यामध्ये पोलिसांचा दरारा निर्माण केला होता. अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात अंकुश मिळविला होता. 


 


अवैध प्रवाशी वाहतुकीवर त्यांनी स्वत: कारवाई करीत कडक अंमलबजावणी केली होती. त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये त्यांचा मोठा दरारा निर्माण झाला होता. अशा या डॅशिंग अधिकाऱ्यांची नेमणूक पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी सरकारने केली आहे.


 


यापूर्वीचे पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची बदली झाली झाल्याने आयपीएस अधिकारी ते आयर्नमॅन, अल्ट्रामॅनचा किताब पटकाविलेले कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. मुंबई येथे पोलीस महासंचालक कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured