महाराष्ट्र कॉंग्रेसच्या नवनियुक्त प्रभारीपदाचे एच.के. पाटील यांना कोरोनाची लागण : अनेक दिग्गज नेते अडचणीत

 मुंबई : महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रभारीपदी नुकतेच नवनियुक्त झालेले एच.के. पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात पाटील यांनीच ट्वीट करून माहिती दिली. विशेष म्हणजे एच.के. पाटील यांनी नुकतीच मुंबई दौऱ्यावर येऊन राज्यातील वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांची बैठक घेतली होती. एच. के. पाटील पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत.

 एच.के. पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये माहिती देताना सांगितले कि, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी 10 दिवसांसाठी स्वत;ला क्वारंटाईन केले आहे. माझी सध्या तबियत ठीक आहे. मात्र गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

धक्कादायक म्हणजे गेल्या गुरुवारीच एच.के. पाटील मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आदी नेते उपस्थित होते. त्यामुळे त्यांनाहि संसर्ग झाला नसावा अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments