Type Here to Get Search Results !

देशातील बरीच लोकसंख्या अद्यापहि कोरोनामुळे संक्रमित होण्याचा धोका ?


 


देशातील बरीच लोकसंख्या अद्यापहि कोरोनामुळे संक्रमित होण्याचा धोका ?



नवी दिल्ली : आयसीएमआरने दुसऱ्या सेरो सर्व्हेचा अहवाल आज जाहीर झाला आहे. या सर्वेक्षणानुसार, देशातील 10 वर्षाखालील प्रत्येक 15 व्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की शहरी भागात कोरोना व्हायरसचा प्रसार जास्त प्रमाणात झाला आहे. कोरोना व्हायरसची पाहणी करणारा हा सेरो सर्वे भारतातील 21 राज्यांमधील 70 जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. हे सर्वेक्षण 17 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर दरम्यान घेण्यात आले. सर्वेक्षणात या ठिकाणांवरून 29,082 लोकांचे नमुने घेण्यात आले आहेत, त्या आधारे हा अहवाल सादर करण्यात आला आहे.



कोरोना व्हायरससाठी आयसीएमआरच्या दुसऱ्या सिरो सर्वेक्षणात ऑगस्ट 2020 पर्यंत नोंद झालेल्या प्रत्येक रुग्णाद्वारे 26–32 जणांना लागण झाल्याचे आढळले असल्याची माहिती आयसीएमआरचे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी दिली. शहरी भागातल्या झोपड्यांमधला धोका हा विना झोपड्या विभागाच्या दुप्पट तर ग्रामीण भागापेक्षा चौपट धोका असल्याचे आढळून आले आहे. लॉक डाऊन, प्रतिबंधित क्षेत्र, वर्तनात्मक परिवर्तन यामुळे कोरोना व्हायरसच्या संभाव्य प्रसाराला प्रभावी आळा बसल्याचेही त्यांनी सांगितले.



दुसऱ्या सेरो सर्व्हेच्या निकालानुसार :



 देशातील बरीच लोकसंख्या अद्याप कोरोनामुळे संक्रमित होण्याचा धोका आहे.



 10 वर्षांपेक्षा मोठ्या लोकांमध्ये कोरोनाचे प्रमाण 6.6 टक्के असल्याचे आढळले.



 देशातील 10 वर्षांहून अधिक वयाच्या प्रत्येक 15 व्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.



शहरी झोपडपट्ट्यांमध्ये 15.6 टक्के, झोपडपट्टी नसलेल्या भागात 8.2 टक्के प्रसार आढळून आला. तर ग्रामीण झोपडपट्टी भागात 4.4 टक्के प्रसार झाला आहे.



शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाता कोरोनाचा प्रसार कमी आहे.



मोठ्या प्रमाणात होणारं संक्रमण रोखण्यासाठी 5 टी (टेस्ट, ट्रॅक, ट्रेस, ट्रीट आणि टेक्नॉलॉजी) धोरण अवलंबणे आवश्यक आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies