कृषी विधेयकांविरोधात देशातील शेतकरी संघटनांची भारत बंदची हाक 

कृषी विधेयकांविरोधात देशातील शेतकरी संघटनांची भारत बंदची हाक 

 कृषी विधेयकांविरोधात देशातील शेतकरी संघटनांची भारत बंदची हाक मुंबई : संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या कृषी विधेयकांविरोधात देशातील शेतकरी संघटनांनी आज, शुक्रवारी भारत बंदची हाक दिली आहे. पंजाब, हरियाणा, महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील विविध शेतकरी संघटना या बंदमध्ये सहभागी होत आहेत
केंद्राने बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना हमीभाव नाकारणारी, बाजार समित्यांचे अस्तित्व पुसणारी व शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारी प्रक्रिया पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आहे.


केंद्राची ही भूमिका शेती, माती व शेतकऱ्यांशी द्रोह करणारी आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा  किसान सभेच्यावतीने धिक्कार असून शेतकरी संघटनांच्या देशव्यापी मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने या विधेयकांविरोधात आज देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे, असे अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनेही शेतकरी संघटनांच्या भारत बंदला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. केंद्रामध्ये सरकारने मंजूर केलेली कृषी विधेयक विधेयके म्हणजे शेती व शेतकरी यांना उद्ध्वस्त करण्याचाच डाव आहे. या विधेयकांमुळे आगामी काळात भांडवलदारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments