लॉकडाऊन असताना दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करावी ; नगरसेवक अकिल काझी यांचे म्हसवड पालिकेसमोर आंदोलन सुरु 

लॉकडाऊन असताना दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करावी ; नगरसेवक अकिल काझी यांचे म्हसवड पालिकेसमोर आंदोलन सुरु 


 


लॉकडाऊन असताना दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करावी ; नगरसेवक अकिल काझी यांचे म्हसवड पालिकेसमोर आंदोलन सुरु 
माणदेश एक्सप्रेस न्युजम्हसवड/अहमद मुल्ला : सध्या शहर व परिसरात कोविड रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर करुन शहर लॉक केले. पण शहरातील काही मोठे व्यापारी आपली दुकाने घराच्या नांवाखाली उघडे ठेवून राजरोस मालाची विक्री करत आहेत.  शहर नांवालाच लॉकडाऊन आहे. तरी प्रशासनाने एकतर शहर १००% बंद ठेवावे नाहीतर १००% चालू ठेवावे या मागणीसाठी पालिकेतील विरोधी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गटनेते अकिल मैनुद्दीन काझी पालिकेच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषणास बसले आहेत.शहरातील काही मोठे व्यापारी शहरात लॉकडाऊन असतानाही राजरोसपणे मालाची विक्री करत असल्याने शहरात गत चार दिवसापासून नागरीकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढणार असून प्रशासन अशा व्यापाऱ्यांवर दंडात्मक व किरकोळ कारवाई करताना दिसून येते या कारवाईला हे व्यापारी भिक घालत नाहीत. याउलट खरे व्यवसायावर पोट असणारे किरकोळ गरीब व्यापारी या बंद मध्ये प्रमाणिकपणे बंद ठेवत आहेत. त्यांचे अशा व्यापाऱ्यांमुळे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. प्रशासनही अशा गरीब व्यापाऱ्यांना त्रास देते तर मोठ्यांना अभय देते असे चित्र सध्याचे आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलून शटर उघडून मालाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे त्यांच्या कुठूंबियांची व दुकानात काम करणाऱ्या कामगारांचे स्वँब घेऊन कोरोना चाचणी करावी त्याशिवाय त्यांना लॉकडाऊन नंतर प्रशासनाने सुरु होणाऱ्या बाजारपेठेत दुकान उघडे ठेवु देवू नये. टेस्ट झाल्यावरच दुकान उघडे ठेवण्यास परवानगी द्यावी, अन्यथा दुकान सील करण्यात यावे असे प्रशासनाने आदेश काढावे अशा मागण्या केल्या आहेत. प्रशासनाने दुकाने उघडी ठेवणाऱ्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय लॉकडाऊन यशस्वी होणार नाही तसेच कोरोनाची साखळी तुटणार नाही तरी प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी व शहर कोरोनामुक्त करावे असे अकिल काझी म्हणाले.अकिल काझी यांच्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी नगरसेवक डॉ वसंत मासाळ, संजय सोनवणे, प्रदीप तावरे यांनी हजेरी लावली होती.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments