पॉझिटिव्ह तुकाराम मुंडे झाले निगेटिव्ह ; वाचा बातमी सविस्तर 

पॉझिटिव्ह तुकाराम मुंडे झाले निगेटिव्ह ; वाचा बातमी सविस्तर 


 


पॉझिटिव्ह तुकाराम मुंडे झाले निगेटिव्ह कसे वाचा बातमी सविस्तर 
माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी : नागपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त असताना तुकाराम मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता दिलासायक बातमी म्हणजे तुकाराम मुंडे यांनी कोरोनावर मात केली असून याबाबत त्यांनी सदरची माहिती त्यांनी ट्वीट करून स्वत: दिली आहे.“रिकव्हरीच्या दिशेने वाटचाल. आज माझा कोवीड 19 चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. कोरोना पॉझिटिव्ह असल्यावर त्याचा सामना पॉझिटिव्ह विचार आणि कृतीने केला पाहिजे. दृढ इच्छाशक्ती, निश्चय आणि एकत्रितपणे काम केल्यास या संकटावर विजय मिळवता येईल. उज्वल भविष्यासाठी सामाजाने एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. यामध्ये आरोग्याविषय समस्यांचाही समावेश होतो,”  असे ट्वीट मध्ये ते म्हणाले आहेत.दरम्यान 26 ऑगस्ट रोजी मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरुन त्यांना थेट मुंबईतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये बदली देण्यात आली होती.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments