मनसेच्या जिल्हाउपाध्यक्षासह ५ जणावर गुन्हे दाखल ; राजपथ इन्फ्राकॉनच्या ऑफिसची मोडतोड तसेच पोकलँड व हायवा गाड्याच्या काचा फोडल्या 


 


मनसेच्या जिल्हाउपाध्यक्षासह ५ जणावर गुन्हे दाखल ; राजपथ इन्फ्राकॉनच्या ऑफिसची मोडतोड तसेच पोकलँड व हायवा गाड्याच्या काचा फोडल्या 
माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी : शेटफळे ता. आटपाडी जि. सांगली येथील पात्रेवाडी नजीक असलेल्या राजपथ इन्फ्राकॉनच्या ऑफिसची तसेच पोकलँड व हायवा गाड्याच्या काचा फोडल्या प्रकरणी मनसेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष राजेश जाधव यांच्यासह ५ जणावर आटपाडी पोलीस ठाणे येथे भा.द.वि.स.कलम ४५२, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ व महाराष्ट्र पोलीस अधि ३७ (१)(३), १३५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत राजपथ इन्फ्राकॉनचे प्रोजेक्ट मॅनेजर अरुणकुमार रामपार्थनी रेड्डी व.व. ४० यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १७ रोजी दुपारी १२.०० चे सुमारास शेटफळे येथील राज्य महामार्गावरील व पात्रेवाडी येथील राजपथ इंफ्राकॉनच्या ऑफिसमध्ये आरोपी राजेश जाधव, अमर पवार व इतर चार अनोळखी लोक आले व कंपनीचे पोकलँड व हायवा गाड्याच्या काचा फोडल्या. तसेच काही कारण नसताना तेथील टेबल व खुर्च्या काठीने फोडून टाकल्या यामध्ये फिर्यादी अरुणकुमार रामपार्थनी रेड्डी यांच्यासह अजित बानशी, ब्रम्हा गावडे, नवनाथ पुजारी, सुनील गावडे, सचिन गावडे हे जखमी झाले आहेत. सदर घटनेचा अधिक तपास पोहेकॉ मल्लाळकर हे करीत आहेत.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured