पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट

पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट


पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट


 


मुंबई : कोरोनामुळे पावसाळी अधिवेशन दोन वेळा पुढे ढकलल्यानंतर अखेरीस 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, या अधिवेशनावर कोरोनाचं सावट आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर पावसाळी अधिवेशनात अनेक आमदार गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.


 


पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहू शकत नसल्याचं बहुतांश आमदारांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोलो यांना पत्र लिहून कळवलं आहे. काही आमदारांची वयाचं कारण देत अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितल आहे तर काही आमदारांनी विविध आजारावर उपचार घेत असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनाला 25 टक्के आमदारांची उपस्थिती घटेल सूत्रांची माहिती दिली आहे.


 


दुसरीकडे, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. एवढंच काय तर कोरोनामुळे नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. काही नेत्यांना तर कोरोनामुळे आपला जीव गमावला लागला आहे. त्यामुळे यंदा कोरोनाचा पादुर्भाव लक्षात घेता पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं घेण्याचा निर्णय झाला आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील कोरोनामुळं वेळेआधी स्थगित करावं लागलं होतं.


 


खुद्द विधानसभा अध्यक्षांनाच कोरोनाची लागण झाली आहे. नाना पटोले यांनी टवीट करत याबाबत माहिती दिली आहे. ’गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन.’ असं नाना पटोले यांनी आपल्या टवीटमध्ये म्हटलं आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments